| पुणे | छत्रपती संभाजी महाराजांच्या ३५९ व्या जयंती १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडे एक मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत नसल्याबद्दल कोल्हे यांनी खंत व्यक्त केली आहे. ट्विटवरुन त्यांनी यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर राज्य सरकाने यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी. @CMOMaharashtra @NCPspeaks
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 12, 2020
कोल्हे यांनी मंगळवारी ट्विटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख राज्य सरकारच्या महापुरुषांशी संबंधित दिनविशेष यादीत नसल्याचे निर्दर्शनास आणून दिले. “महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही,” असं कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तसेच पुढे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपाचरिक ट्विटर हॅण्डलला टॅग करत, “विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी,” असंही म्हटलं आहे.
यापूर्वी ‘ राजा शिवछत्रपती ‘ या लोकप्रिय मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांवरील आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा