डॉ. अमोल कोल्हे यांनी केली ‘ ही ‘ विशेष व महत्वाची मागणी..!

| पुणे | छत्रपती संभाजी महाराजांच्या ३५९ व्या जयंती १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडे एक मागणी केली आहे.  छत्रपती संभाजी महाराजांचे नाव थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत नसल्याबद्दल कोल्हे यांनी खंत व्यक्त केली आहे.  ट्विटवरुन त्यांनी यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर राज्य सरकाने यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

कोल्हे यांनी मंगळवारी ट्विटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख राज्य सरकारच्या महापुरुषांशी संबंधित दिनविशेष यादीत नसल्याचे निर्दर्शनास आणून दिले.  “महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही,” असं कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

तसेच पुढे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपाचरिक ट्विटर हॅण्डलला टॅग करत, “विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी,” असंही म्हटलं आहे.

यापूर्वी ‘ राजा शिवछत्रपती ‘ या लोकप्रिय मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांवरील आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *