| मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून दादर येथील महापौर बंगल्याला खूप महत्त्व प्राप्त झाले असून सरकारच्या विविध बैठका महापौर बंगल्यातच घेतल्या जात आहेत. आजवरचे मुख्यमंत्री सर्व बैठका मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा किंवा राज्य अतिथीगृह सह्याद्री येथेच घेत असत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महापौर निवासस्थान हे आवडते ठिकाण असल्याने येथे बैठकांचा सिलसिला मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने सरकारच्या चर्चेचे हे नवे केंद्र तयार झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कनेक्शन:
महापौर बंगला हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते ठिकाण होते. भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते मुंबईत आले की त्यांच्यासोबतच्या बैठका या महापौर बंगल्यातच होत असत. तसेच पक्षाच्या बैठकाही ते याच बंगल्यात घेत असत. ते रोज संध्याकाळी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या हिरवळीवर चालण्यासही येत असत. महापौर बंगल्यात एक मजली पुरातत्व वास्तू असून बाळासाहेबांना पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी विशेषत्वाने लिफ्टची परवानगी देण्यात आली होती. लिफ्ट तयार झाल्यानंतर बाळासाहेब पहिल्या मजल्यावर जात असत. शिवाजी पार्कवरील सभा किंवा दसरा मेळाव्याला बाळासाहेब येत तेव्हा ते प्रथम महापौर बंगल्यातच जात आणि थोडा आराम करीत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा