असे आहे महाविद्यालयांचे वेळापत्रक..!
नवीन वर्ष सप्टेंबर पासून होणार सुरू..!| मुंबई |  कोरोना मुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या या बाबत साशंकता होती.. आता त्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेळापत्रके दिली आहेत. एक २०१९-२० या वर्षासाठी आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आलं आहे.

सन २०१९ – २० शैक्षणिक वर्षासाठी : 

३१ मे २०२० पर्यंत :०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अपूर्ण राहिलेला पाठ्यक्रम ऑनलाइन/ डिस्टन्स लर्निंग/ सोशल मीडिया/ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यांच्या माध्यमातून शिकवण्यात येऊन पूर्ण करण्यात यावा.

१ जून ते १५ जून पर्यंत :  प्रोजेक्ट वर्क, इंटर्नशीप रिपोर्ट, ई लेबल्स, अभ्यासक्रम पूर्ण शिकवून होणे, अंतर्गत मूल्यमापन, असाइनमेंट हे या दरम्यान पूर्ण करावे.

१ जुलै ते ३१ जुलै दरम्यान : परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान या दरम्यान घेतल्या जातील. तसंच या परीक्षांचे निकाल ३१ जुलै २०२० रोजी जाहीर केले जातील.

सन२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी

 महाविद्यालयांसाठी नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पार पडेल. त्यांचं शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिन्यापासून सुरु होईल. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचं शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट २०२० सुरु होईल असंही युजीसीने स्पष्ट केलं आहे.

या सर्व प्रकरणा सबंधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.