एवढी आहे उध्दव ठाकरे यांची संपत्ती..!

| मुंबई | संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीचे आकडे अखेर समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे.  त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे १४३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं. 

स्वत:कडे एकही वाहन नाही, दोन घरं आहेत, एक फार्महाऊस आहे, तसंच विविध कंपन्यांच्या शेअर्समधून येणारा डिव्हिडंट हे उत्पन्नाचे स्त्रोत अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. उद्धव ठाकरे हे संपत्ती जाहीर करणारे दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत्ती जाहीर केली होती.

उद्धव ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाचे मुद्दे

१. उद्योग व्यवसायाच्या कॉलममध्ये उद्धव ठाकरेंनी – नोकरी म्हटलं आहे.
तर पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावासमोर – उद्योग/व्यवसाय आहे.

२. एकूण संपत्ती
उद्धव ठाकरेंची संपत्ती – 76 कोटी 59 लाख 57 हजार 577
रश्मी ठाकरेंची संपत्ती – ‬65 कोटी 09 लाख 02 हजार 791
हिंदू अविभक्त कुटुंब – 1 कोटी 58 लाख 14 हजार 395
एकूण – 143 कोटी 26 लाख 74 हजार 763‬

३. वाहन
उद्धव ठाकरे – नाही
रश्मी ठाकरे – नाही
हिंदू अविभक्त कुटुंब – नाही

४. उत्पन्नाचे साधन
उद्धव ठाकरे – नोकरी : पगार/वेतन, व्याज, बोनस, लाभांश (डिव्हिडंट), भांडवली नफा
रश्मी ठाकरे – व्यवसाय : व्याज, भाडे, व्यावसायिक भागीदारी नफा

५. शिक्षण
उद्धव ठाकरे – बालमोहन विद्यामंदीर, दादर, मुंबई, सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, (डिप्लोमा) – वर्ष १९८२

६. एकूण किती केसेस?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण २३ प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील १२ रद्द झाल्या असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *