‘ हा ‘ मराठी चित्रपट गाजतोय जगभरात..
बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील आघाडीच्या १० चित्रपटात स्थान..!| मुंबई |अक्षय इंडीकर या मराठमोळ्या दिगदर्शकाचा ‘स्थलपुराण’ चित्रपट मानाच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला. या चित्रपटानं मोहोत्सवातील आघाडीच्या १० चित्रपटांत स्थान मिळवलं आहे. यापूर्वी ‘स्थलपुराण’ व्यतिरिक्त ‘सामना’, ‘विहीर’, ‘किल्ला’ आणि ‘सैराट’ हे केवळ चार मराठी चित्रपट या चित्रपट महोत्सवात झळकले होते.

बर्लिन चित्रपट मोत्सवात आघाडीच्या चित्रपट दिग्दर्शकाचे चित्रपटाचे मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी गेले होते. mubi.com या जागतिक सिनेमाच्या दर्जेदार संकलनाचे काम करणाऱ्या वेबसाईटवर बर्निल महोत्सवातील आघाडीच्या दहा चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारी ही यादी खूप प्रतिष्ठित मानली जाते.  मिंग यांग , आबेल फेररा , हाँग सॉंग सू या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकांचा कांस चित्रपट महोत्सवात अनेकदा सन्मान झाला आहे. त्याच दिग्दर्शकांच्या सिनेमाच्या यादीत मराठी दिग्दर्शक आणि सिनेमा झळकला आहे.

बर्लिन महोत्सवातील वेगवेगळ्या विभागातील नावाजलेल्या आणि तरुण दिग्दर्शकांच्या कामाला जगभरातून प्रेक्षक लाभतो जवळपास तीन लाख लोक तिकीट काढून हा चित्रपट महोत्सव बघतात. यामध्ये यंदा अक्षय इंडीकर या मराठमोळ्या दिगदर्शकाचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट झळकला आहे.

चित्रपटात आहे काय..?

स्थलपुराण हा चित्रपट एका लहान मुलाची मनोभूमीका प्रेक्षकांसमोर मांडतो. आठ वर्ष वय असलेल्या दिगू या मुलाचे शहरातून आपल्या आई आणि बहिणीसोबत अचानक कोकणातल्या एका लहान गावात झालेले स्थलांतर , गर्द पाऊस आणि रोरावणाऱ्या समुद्राची उत्कट आणि उदास पार्श्वभूमी, आणि भवतालच्या साऱ्या गलबलाटात अचानक अदृश्य झालेल्या आपल्या वडीलांचा शोध असे मध्यवर्ती कथानक असलेला हा सिनेमाने जगभरातल्या सिनेरसिकांना आवडला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *