या आमदाराचा कोरोना मुळे मृत्यू..!

| चेन्नई | देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे एका आमदाराचे निधन झाल्याचे वृत्त बुधवारी समोर आले आहे. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कडघमचे आमदार जे अंबाजगन यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना २ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर डॉ. रेला इंस्टिट्युट अँड मेडिकल सेंटरमध्ये उपचार केले जात होते. कोरोनामुळे त्यांना न्युमोनिया झाला होता. यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यासह अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले. परंतु, सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आणि बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.(Mla dead due to corona)

द्रमुक अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एका भावनिक पोस्टमध्ये अंबाजगन यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांना भाऊ या शब्दात संबोधित करताना ते नेहमीच लोकांच्या सेवेसाठी समर्पित होते. अनेकांसाठी ते एक पेटती मशाल होते. कोरोनाच्या संकटातही त्यांनी अनेकांची पुढे येऊन मदत केली. द्रमुकने महामारीच्या संकटात राबविलेल्या मोहिमेत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. परंतु, दुर्दैवाने त्यांनाच कोरोनाची लागण झाली असे स्टॅलिन म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील शिवसेनेचे मीरा भाईंदर चे ज्येष्ठ नगरसेवक तसेच ठाण्यातील राष्ट्रवादीचे लोकप्रिय नगरसेवक यांचे कोरोना मुळे निधन झाले आहे.(Mla dead due to corona)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *