यंदा शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत..!
घरी राहूनच सोहळा साजरा करण्याचे युवराज संभाजीराजे यांचे आवाहन..!

| कोल्हापूर – रायगड | कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून निवडक कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रायगडावर न येता घरातच शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा, असे आवाहन संयोजक तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.(Shivaji Maharaj Coronation)

 दरवर्षी रायगडावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. राज्यभरातून चाळीस ते पन्नास हजार शिवभक्त शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला उपस्थित राहतात. पण यावेळी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रायगडावर हा दिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्यासह निवडक कार्यकर्ते रायगडला गेले.  शनिवारी निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ केला जाणार आहे.

‘शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा’
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक दिन शिवभक्तांनी घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. घरासमोर स्वराज्याचा भगवा ध्वज लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले होते.(Shivaji Maharaj Coronation)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *