
| नांदेड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चिंताजनक वातावरण आहे. सरकार वेगवेगळ्या उपयोजना राबवून ते नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु या परिस्थितीत देखील ग्रामविकास विभागाने १५% बदल्यांबाबत शासन निर्णय काढून त्या नुसार कार्यवाही करावयास सांगितले होते. परंतु, नांदेड जिल्हा परिषदेने याला छेद देवून या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
शासन पत्रानुसार जिल्हा परिषद मधील गट क व गट ड च्या कर्मचा-याच्या बदल्या शासन निर्णयातील तरतूदी नुसार करण्याबाबत निर्देश दिलेले होते, त्यानूसार जिल्हा परिषद कर्मचा-याच्या बदल्याचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आलेले होते. तथापि नांदेड शहरासह जिल्हयातील ग्रामीण भागात कोविड -१९ या वाढत्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अशा परिस्थीतीत बदल्याच्या समुपदेशनसाठी जिल्हा परिषद मुख्यालय येथे मोठया प्रमाणात कर्मचारी उपस्थित राहणार आहे ही बाब विचारात घेता कोविड -१९ प्रादुर्भाव वाढू नये यामुळे जिल्हा परिषद कर्मचा-याच्या सन २०२० च्या सर्वसाधारण बदल्या रदद् करण्याचा निर्णय अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली आहे.
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!