दूध उत्पादकांच्या जीवावर जे मोठे झाले ते आहेत कुठे.?
माजी आमदार राहुल जगताप यांचा खडा सवाल

आज फक्त शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन डेअरी चालु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी अनेक दिवस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधावर अनेक उद्योग उभारले सत्ता भोगली त्यांनी मात्र शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडण्याच काम केले आहे.

अहमदनगर:- संकटाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृष्णकन्हैय्या डेअरीच्या माध्यमातून सरकारी दरानेच दूध संकलन करणार असल्याची माहिती माजी आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. अडचणीच्या काळात मोठ्या मोठया दूध डेअरींनी दूध संकलन केंद्रे बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेले आहे तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावाने दुधाच्या मागणी घटली असली तरी सरकारी दरानेच दूध संकलन करणार असल्याची माहिती राहुल जगताप यांनी दिली.


नगर जिल्हयात रोज सुमारे २६ लाख लिटर दुध संकलन होत आहे त्यात कृष्णकन्हैय्या डेअरीकडे दीड लाख लिटर दुध संकलन होत आहे. कोरोनामुळे दुधाची शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुधाच्या मागणीत मोठी घट झालेली आहे त्यामुळे अनेक मोठ्या मोठ्या डेअरींनी त्यांचे दूध संकलन बंद केलेले आहे त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, अशा अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नसल्याने कृष्णकन्हैय्या डेअरीने दूध संकलन सूरु ठेवले असून इथून पुढील काळातही तसेच चालू राहील असे राहुल जगताप यांनी सांगितले.

दूध संकलन सुरू असल्याने दररोज लाखो रुपयांचे नुकसान डेअरीस होणार आहे मात्र शेतकरी हितासाठी दूध संकलन सूरु राहणार असून ते शेवटपर्यंत तसेच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. सरकारने दूध खरेदीचा दर ठरवून दिलेला असून सुद्धा २० मार्च पर्यंत ३२ रुपये दराने भाव दिलेला आहे आता तोट्यात असल्याने सरकारी दराने भाव देणार असल्याचे राहुल जगताप यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *