सुशांत सिंह राजपूत ला पंतप्रधान यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाकडून श्रद्धांजली..!

| मुंबई | बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर असलेल्या मुलीने आत्महत्या केली होती. या घटनेवर बॉलिवूडसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.

सुरुवातीला मालिकांमधून आपल्या करियरला सुरूवात करणाऱ्या सुशांतने २०१३ सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.

त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *