राष्ट्रवादीकडून देखील दोन उमेदवार..! निवडणूक होण्याची शक्यता..!| मुंबई | विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनं आपल्या उमेदवाराची नावं जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली. त्याचबरोबर दोन्ही उमेवादारांच्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोरोनाच्या चिंतेबरोबर राज्यात राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

  राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. “शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे,” असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीवर महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.  सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे म्हणून निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.