उध्दव ठाकरे यांच्या सासऱ्यांचे निधन..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. माधव पाटणकर यांनी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला असून पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.