सोनियांच्या बैठकीला उध्दव यांची उपस्थिती, सेनेचा अधिकृत यूपीए मधील प्रवास सुरू..!

| नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. कोरोना संकटकाळात पहिल्यांदाच विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला २२ पक्षाचे नेते असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत. या बैठकीच्या सुरुवातीला अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. “केंद्र सरकारने अम्फान चक्रीवादळाला तातडीने राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, तसेच या चक्रीवादळचा फटका ज्या राज्यांना बसला आहे, त्यांना आर्थिक मदत द्या,” अशी मागणी यात करण्यात आली.

 या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, डीएमके नेते एम के स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सहभागी झाले होते. 

सोनिया गांधी काय म्हणाल्या?

  • कोरोना म्हणजे २१ दिवसांचं युद्ध आहे, असा भ्रम मोदींनी देशासमोर उभा केला आहे.
  • सरकारकडे लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचं कसलंच धोरण नाही.
  • काँग्रेससह समविचारी पक्षांनी अशा संकटात गरिबांच्या खात्यात थेट मदतीची मागणी केली आहे.
  • सरकारनं थेट खात्यात पैसे टाकण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना संकटाच्या आधीच घरघर लागली आहे
  • २०१७ च्या मध्यापासून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था गोत्यात
    सलग ७ तिमाहींमध्ये जीडीपीची घसरण झाली आहे, ही साधी गोष्ट नव्हती.

शरद पवार काय म्हणाले?

  • रस्ते, विमान आणि रेल्वे वाहतूक हळूहळू सुरु करणं गरजेचं
  • राज्यांमध्ये नव्या गुंतवणुकीसाठी नवं धोरण आखलं जावं
  • उद्योजक, तज्ञ मंडळींसोबत नव्या धोरणांबाबत चर्चा केली जावी
  • शैक्षणिक संस्था बंद राहिल्या तर विद्यार्थ्यांचं, संस्थाचालकांचं नुकसान होईल, एक तज्ञांचा गट त्यासाठी तयार करण्यात यावा
  • पंतप्रधानांनी राजकीय पक्षांशी संवाद साधावा, आम्हाला गांभीर्यानं ऐकावं
  • १० पॉईंटचा अजेंडा विरोधी पक्षांतर्फे पंतप्रधानांना दिला जाईल
  • वैयक्तिक राजकीय फायद्यात न पडता, या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा
  • राज्यांना आर्थिक मदत करण्यासाठी खरेपणाने प्रयत्न करावेत
  • संसदीय कमिट्यांमार्फत काम केलं जावं, त्यांची आता नितांत गरज आहे.
 दरम्यान या बैठकीतील सेनेच्या उपस्थितीमुळे सेनेचा प्रवास अधिकृतपणे एनडीए ते यूपीए झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *