मरकझ मधील क्वारंटाइन केलेल्या नागरिकांचे घृणास्पद कृत्य..

नेटिझन्सने झोडपले , केली कठोर कारवाईची मागणी..

नवी दिल्लीः दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमातच्या मरकझमधून प्रशासनाने शेकडो नागरिकांना बाहेर काढलंय. आता त्यांना हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केलं गेली. काहींना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. क्वारंटाइन केलेल्या काही जण वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत आहेत आणि त्यांच्यावर थुंकण्याचा विकृतपणा करत आहे. सहकार्य करत नाहीए, असं रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

निझामुद्दीनमधील तबलीघी जमातच्या मरकझमधील १६७ जणांना ५ बसेसमध्ये तुघलकाबाद येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये काल रात्री ९.४० ला आणण्यात आलं. आणखी ९७ जणांना रेल्वेच्या डिझेल शेड ट्रेनिंग स्कूलमध्ये क्वारंटाइन केलं गेलं. तर ७० जणांना आरपीएफच्या बॅरेकमध्ये क्वारंटाइन केलं गेलंय, अशी माहिती उत्तर रेल्वे विभागीय मंडळाचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितलं.

पण मरकझमधील या क्वारंटाइन केलेल्या नागरिकांपैकी काही जण सकाळपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत आहेत. कर्मचाऱ्यांकडे ते खाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करत आहेत. तसंच ठिकठिकाणी थुंकत असून कर्मचाऱ्यांवरही थुंकत आहेत. डॉक्टरांवरही थुंकत असून शिवीगाळ करत आहेत. एका जागी न थांबता फिरत आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली.

या बातम्यांवरून नेटिझन्स भडकले असून त्यांनी या किळसवाण्या कृत्याला चोख प्रत्युत्तर द्यावे अशीच मागणी केली आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *