#Unlock5 वाचा : काय सुरू, काय बंद..!

| मुंबई | राज्य सरकारकडून ‘अनलॉक-5’ साठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या ५ ऑक्टोबरपासून ५०% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे.

यासोबतच,मुंबईच्या डबेवाल्यांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांना यादरम्यान, लोकल प्रवासासाठी QR कोड दिले जातील. दरम्यान, सरकारने मेट्रो, सिनेमा हॉल, स्विमिंग पूलला अद्याप परवानगी दिलेली नाही. यासोबतच, शाळा आणि कॉलेजेही ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. परंतू, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक्स्प्रेसने जाण्यास परवानगी असेल.

अनलॉक 5 मध्ये काय सुरू आणि काय बंद असेल ?

✓ राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
✓ डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
✓ मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवणार
✓ अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय इतर उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
✓ ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
✓ पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार

काय बंद राहणार?

शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क

Leave a Reply

Your email address will not be published.