आज कार ने प्रवास करताना हे साधन वापरा सोबत – मुंबई महापालिकेचा सल्ला..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आणखी नवे संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. मुंबईलाही या वादळाचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे मुंबई पालिकेनं मुंबईकरांसाठी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहे.(nisarg cyclone)

 पाण्यात गाडी अडकल्यास व ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन असणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार – जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची सूचना महापालिकेनं केली आहे. 

 

२६ जुलै २००५ चा दुर्दैवी पूर्वानुभव लक्षात घेता कार किंवा जीप ची ‘विंडो’ काच फोडता येईल असे साधन गाडीमध्ये सहज हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवणे उपयुक्त ठरेल. २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टी दरम्यान काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. गेल्या वर्षी २०१९ च्या पावसात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन व अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे..(nisarg cyclone)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *