Verified Call ; गुगलचे येतंय नवे कोरे फीचर…! घ्या जाणून..

| नवी दिल्ली | जगात गुगल हे सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक हव्या त्या गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता गुगलने एक खास फीचर आणलं आहे. गुगलकडून Verified Calls फीचरची घोषणा करण्यात आली आहे. Google Phone अ‍ॅप्सचा हा एक भाग आहे. यामुळे तुम्हाला कोण कॉल करतंय याबाबतची माहिती मिळणार आहे.

कॉल फ्रॉड्सवर लगाम लावणं हा गुगलच्या या खास फीचरमागचा मुख्य उद्देश आहे. भारतासह जगभरात फ्रॉड कॉल्स ही मोठी समस्या आहे. तसेच Verified Calls फीचर रोल आउट करण्यासोबतच युजर्सचा यापासून बचाव होणार आहे. बिझनेस कॉलमध्ये युजर्सला कोण आणि का कॉल करत आहे हे दिसणार आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्पेन, ब्राझील, मेक्सिको आणि यूएससह जगभरात हे फीचर रोलआऊट केले जात आहे.

बिझनेस कॉल करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार

सध्या TrueCaller हे अ‍ॅप युजर्सना असे फंक्शन देत आहे. Google Phone अ‍ॅपमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा एक भाग बनणार आहे. म्हणजेच वेगळं कोणतंही अ‍ॅप यासाठी खास डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. Verified Calls ही TrueCaller अ‍ॅपसारखं काम करणार आहे.

एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने दिलेल्या माहितीनुसार, पायलट प्रोग्रॅमच्या सुरुवातीला रिझल्ट्स खूप चांगले राहिले आहे. युजर्संना याचा फायदा नक्की मिळेल.

गुगलच्या पिक्सल सीरीज शिवाय खूप अँड्रॉईड फोन्समध्ये डिफॉल्ट Google Phone अ‍ॅप हेच डायलरचे काम करीत असतात. या सर्व फोन्समध्ये नवीन फीचर अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये Google Phone अ‍ॅप इन्स्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इंस्टॉल करता येते. गुगलचे हे नवीन फीचर्स युजर्संना बिझनेस कॉल करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार आहे. TrueCaller मध्ये हे फीचर अद्याप उपलब्ध नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *