वांद्रे प्रकरणामागील विनय दुबे यांना अटक..!


  • विनय दुबेने ‘चलो घर की ओर’ मोहीम सुरु केली होती..
  • नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे.

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्टेशनवर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. त्यानंतर त्याला रात्री उशिरा वांद्रे पोलिसांत हजर करण्यात आलं, तिथे त्याला अटक करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करुन पुढील कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर आहे.

विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. विनय दुबेचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क आहे.

विनय दुबेने ‘चलो घर की ओर’ मोहीम सुरु केली होती. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हे आवाहन केलं होतं. यासंदर्भात त्याने ट्वीटही केलं होतं. स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्याने दिला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *