नवीन नियमांचा इंग्लंड वि वेस्ट इंडीज दुसऱ्या कसोटी सामन्यात भंग, चेंडूला लाळ लावल्याने हा होणार दंड..!

| मँचेस्टर | कोरोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेले काही महिने बंद होतं. तब्बल ४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत वेस्ट इंडीज १-० ने आघाडीवर आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयसीसीने काही नवीन नियम आखून दिले आहेत. ज्यामध्ये खेळाडूंना आणि गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाहीये. कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा क्षेत्ररक्षक डोम सिबलेने चेंडू चमकवण्यासाठी अनावधानाने लाळेचा वापर केला. मात्र आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्यानंतर सिबलेने पंचांना याबद्दलची माहिती दिली. पंचांनीही तात्काळ तो चेंडू सॅनिटाईज केला.

काय आहे नवीन नियम :
आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, मैदानावरील पंच खेळाडूंना किंवा गोलंदाजाला लाळेचा वापर करु नये यासाठी दोनवेळा सूचना देऊ शकतात. मात्र यानंतरही वारंवार असा प्रकार घडत असेल तर संघाला ५ धावांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *