टरबूज्या , चंपा हे भाजपच्याच नेत्यांनी केलेले बारसे..!

| धुळे | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पडळकरांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात भाजपाच्या भूमिकेवर टीका केली आहे. गोटे यांनी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भातही एक खुलासा केला आहे. फडणवीस यांचे टरबुज्या हे नाव सर्वश्रुत होण्यामागे भाजपाचे नेतेच असल्याचा दावा गोटे यांनी केला आहे.

भाजपामधील नेत्यांचे बारसे अन्य कुणाला करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही असा टोला गोटे यांनी आपल्या पत्रकामधून लगावला आहे. “एकमेकांमधील द्वेष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूक बारसं साजरं केलं. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे. आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झालं आहे. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय?,” असा टोला गोटे यांनी आपल्या पत्रकामधून लगावला आहे. पुढे बोलताना गोटे यांनी भाजपामध्ये नावं छोटी करुन वापरण्याची पद्धतच असल्याचे म्हटले आहे. “भाजपामध्ये स्वता:च नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पद्धत आहेच. नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात अणित शहांना ‘मोटाभाई’ म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हणत असावेत,” असा टोला गोटे यांनी लगावला आहे.

दरम्यान अनिल गोटे यांनी आपल्या पत्रातून पडळकर यांच्या वक्तव्यावर व त्यावरून भाजप वर जोरदार हल्ला चढवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *