| मुंबई | न्यूयॉर्कमध्ये टाईम्स स्क्वेअरमध्ये एक घडय़ाळ बसविण्यात आले असून याला ‘ट्रम्प डेथ क्लॉक’ नाव देण्यात आले आहे. या घडय़ाळात विषाणूमुळे अमेरिकेत किती जणांचे बळी गेले हे दर्शविले जात आहे. हे क्लॉक अमेरिकन चित्रपटनिर्माते यूजीन जरेकी यांनी तयार केले आहे. चित्रपट निर्माते यूजीन जेर्की यांनी २ वेळा सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार पटकावला आहे. ट्रम्प यांनी गांभीर्य ओळखून वेळीच पावले उचलली असती तर इतके बळी गेले नसते. देशातील ६० टक्के मृत्यू रोखता आले असते असे जरेकी यांनी एका पोस्टमध्ये नमूद केले आहे.
ट्रम्प डेथ क्लॉकनुसार सोमवारपर्यंत ४८ हजारांपेक्षा जास्त जणांचा सरकारच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनामुळे खाली झालेल्या टाईम्स स्क्वेअर बिल्डिंगच्या सगळ्यात उंच ठिकाणी हा बिलबोर्ड लावण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे ८० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर यापेक्षा अर्ध्या जणांचा मृत्यू झाला असता, असे बोर्ड लावताना म्हटले आहे.
जर्की यांची भूमिका नक्की काय :
ट्रम्प यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले असते, तर अनेकांचे जीव वाचले असते, असं यूजीन जेर्की म्हणाले आहेत. १६ मार्चऐवजी ९ मार्चलाच ट्रम्प यांनी सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य केलं असतं आणि शाळा बंद केल्या असत्या तर ६० टक्के मृत्यू रोखता आले असते, असं जेर्की म्हणाले. अमेरिकेतले संसर्गजन्य रोगातील तज्ज्ञ एंथनी फौसी यांच्या संशोधनाचा दाखला यूजीन जेर्की यांनी यावेळी दिला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा