वाचावे ते नवलच : काय आहे ट्रम्प डेथ क्लॉक..!

| मुंबई |  न्यूयॉर्कमध्ये टाईम्स स्क्वेअरमध्ये एक घडय़ाळ बसविण्यात आले असून याला ‘ट्रम्प डेथ क्लॉक’ नाव देण्यात आले आहे. या घडय़ाळात विषाणूमुळे अमेरिकेत किती जणांचे बळी गेले हे दर्शविले जात आहे. हे क्लॉक अमेरिकन चित्रपटनिर्माते यूजीन जरेकी यांनी तयार केले आहे.  चित्रपट निर्माते यूजीन जेर्की यांनी २ वेळा सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार पटकावला आहे. ट्रम्प यांनी गांभीर्य ओळखून वेळीच पावले उचलली असती तर इतके बळी गेले नसते. देशातील ६० टक्के मृत्यू रोखता आले असते असे जरेकी यांनी एका पोस्टमध्ये नमूद केले आहे.

ट्रम्प डेथ क्लॉकनुसार सोमवारपर्यंत ४८ हजारांपेक्षा जास्त जणांचा सरकारच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनामुळे खाली झालेल्या टाईम्स स्क्वेअर बिल्डिंगच्या सगळ्यात उंच ठिकाणी हा बिलबोर्ड लावण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे ८० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर यापेक्षा अर्ध्या जणांचा मृत्यू झाला असता, असे बोर्ड लावताना म्हटले आहे.

जर्की यांची भूमिका नक्की काय :
ट्रम्प यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले असते, तर अनेकांचे जीव वाचले असते, असं यूजीन जेर्की म्हणाले आहेत.  १६ मार्चऐवजी ९ मार्चलाच ट्रम्प यांनी सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य केलं असतं आणि शाळा बंद केल्या असत्या तर ६० टक्के मृत्यू रोखता आले असते, असं जेर्की म्हणाले. अमेरिकेतले संसर्गजन्य रोगातील तज्ज्ञ एंथनी फौसी यांच्या संशोधनाचा दाखला यूजीन जेर्की यांनी यावेळी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *