कोरोना नक्की कुठून आला..? WHO घेणार शोध

| मुंबई / जिनिव्हा | कोरोना विषाणूची निर्मिती चीनमध्ये झाली का, चीनमधूनच याचा प्रसार झाला का, आदी मुद्यांबाबत चौकशी करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ – WHO चे एक पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. मात्र, चौकशी पथकात नेमके कोणते सदस्य असणार आहेत, याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाली असल्याचा दावा याआधीच चीनने फेटाळून लावला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. कोरोना संसर्गाच्या मुद्यावर अमेरिकेने सातत्याने चीनवर निशाणा साधला होता. जगभरात चीनभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर चीनने कोरोनाबाबतची चौकशी करू देण्यास सशर्त परवानगी दिली. चीनमध्ये जाऊन चौकशी पथक प्रयोगशाळांची तपासणी करण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाचा विषाणू हा प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला की प्राण्यांमधून आला याचीही चौकशी पथकाकडून करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले की, कोरोनाच्या विषाणूबाबत जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढ्याच प्रभावीपणे त्याचा सामना करता येऊ शकतो. विषाणू निर्मिती नेमकी कशी झाली, याचा शोध घेणेही महत्त्वाचे आहे. आगामी काही दिवसांत जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चौकशीसाठी चीनमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकने कोरोनाच्या संसर्गाला चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला जवाबदार ठरवले होते. चीनच्या इशा-यावरूनच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबतची माहिती वेळेवर दिली नसल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले झाले असल्याचेही अमेरिकेने म्हटले होते. चीनला झुकतं माप दिले जात असल्याच्या मुद्यावरून अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व सोडले होते.

दरम्यान, जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना संसगार्चा कहर सुरू आहे. काही मोजक्या देशांना कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. कोरोनाचा जोर ओसरणे तर दूर अद्याप संसगार्ने उच्चांक गाठला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जगभरातील देशांनी निदेर्शांचे योग्य पालन न केल्यास कोरोनाचे संकट अधिकच गडद होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिला आहे. जगभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असताना जागतिक आरोग्य संघटनेने संसर्गाच्या मुद्यावर नेत्यांनी राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *