मोदींना पैचान कोण.? दाढी कुठे कोरली..? असे नानाविध टोमणे..!
कालचे मोदींचे भाषण प्रचंड ट्रोल..!

| मुंबई | देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असे पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले.  यावेळेस त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्याची गरज असल्याचे म्हटले. स्थानिक गोष्टी घेण्याला लोकांनी प्राधान्य देणं गरजेचं आहे असंही मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. 

यावरून सोशल मिडियात मोदी प्रंचंड ट्रोल होत असून त्यावर अनेक जोक तयार झाले आहेत. संभ्रम वाढवणारे आणि ठोस कृती कार्यक्रम न ठेवणारे उगाच वेळकाढू भाषण त्यांनी केले असल्याची टीका देखील त्यावर होत आहे.

जितेंद्र आव्हाड यांची टीका:
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आज सकाळी मोदींच्या नाव न घेता एक सूचक ट्विट केले. मोदी प्रत्येक भाषांमध्ये जे शब्द वापरतात ते शब्द एकत्र करून त्यांनी हे ट्विट केले आहे आणि खाली ‘पैचान कौन?’ असे म्हटले आहे.

वसुधैव कुटुंबकम जीवमात्रका कल्याण, सोनेकी चिडिया, गुलामीकी जंजीर, विश्वका कल्याण, आत्मनिर्भरता, मिट्टीकी महक, पसीनेकी खुशबू, खुलेमे शौच, आस्था, गर्व, सशक्त किसान, डेमोग्राफी, पांच पिलर, कोरोना, इत्यादी इत्यादी.

पैचान कौन?

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत :
सचिन सावंत हे ट्विट करत म्हणाले की,

आपदा को अपने अवसर में बदलना-😁

उदाहरणार्थ-
थाली बजाओ, दिया जलाओ इव्हेंट्स , सबसे ताकतवर प्रधानमंत्री, मास्टरस्ट्रोक
और चार मिनट के भाषण को छत्तीस मिनट तक बीच-बीच संस्कृत के वचन घुसेड़कर शब्दों के जंजाल से बढ़ाना-
वगैरह वगैरह

आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आला आहे. या मध्ये फक्त अत्यावश्यक सेवा चालू आहेत. हेअर कटिंग सलून बंद आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक लोकांनी केसही कापलेले नाहीत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करत होते, त्यावेळी ते टापटीप अवतारात होते. दाढी वाढलेल्या जनतेला  मोदी काय सांगतात यापेक्षा मोदींनी दाढी कुठे कोरली? हेअर कट कुठे केला? हे प्रश्न पडले होते. 
यावर यांनी ट्विट करत म्हटले आहे की,

How is Modi ji getting a haircut during this lockdown?
Private barber or atmanirbhar?

तसेच १५ लाख द्या मग बघू ते आत्मनिर्भर वगैरे अश्या आशयाचे देखील प्रचंड मेसेज सोशल मीडियात फिरताना दिसत आहेत. एकंदरित , कालच्या भाषणावरून मोदी प्रचंड ट्रोल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *