माझ्यावर सीमाबंदी तोडल्यानं गुन्हा, मग धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर का नाही?’ – भाजप आमदार सुरेश धस..


बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच ‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’ अशी घोषणाही केली. कोरोना संदर्भात प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. कारखानदारांचे कारखाने सुरुच आहेत. ऊसतोड मजूरांवर मात्र दडपशाही करत पोलिसांकडून मारहाण होत आहे, असाही आरोप सुरेश धस यांनी केला.

सुरेश धस म्हणाले, ‘कोरोना संदर्भात प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. कारखानदारांचे कारखाने सुरुच आहेत. ऊसतोड मजूरांवर मात्र दडपशाही करत पोलिसांकडून मारहाण होत आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाकडून कसलीच अंमलबजावणी होत नाही. यातच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा वचक राहिलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे सध्या जिल्ह्यात नाहीत. ते कोठे आहेत हे कळत नाही. म्हणूनच मी ‘धनंजय मुंडे कळवा आणि हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा करत आहे.’

‘माझ्यावर सीमाबंदी तोडल्यानं गुन्हा, मग धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर का नाही?’ सुरेश धस म्हणाले, ‘मी ऊसतोड मजुरांसाठी सीमा बंदी कायदा तोडला. मात्र, जितेंद्र आव्हाड हे मुंबईवरुन सोलापूरला येतात. एवढंच नाही, तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील मुंबईहून बीडला कसे येऊ शकतात? मग त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत. कोरोना संदर्भात प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची मुस्कटदाबी करण्यात येते आहे.’

नेमके प्रकरण असे की, बीडच्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर खेडमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यात भाजप आमदार सुरेश धस हेही सहभागी झाल्याने त्यांच्यावरही जिल्हाबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


1 Comment

  1. excellent post, very informative. I’m wondering why the other experts of this sector do not notice this.

    You should continue your writing. I am sure, you’ve a great readers’ base already!mini kanken backpackhttps://romarsivi.com/index.php?action=profile;area=forumprofile;u=73580https://wiki-site.win/index.php/The_Most_Common_Mistakes_People_Make_With_kanken_backpack_cheaphttps://progz.hu/index.php?action=profile;area=forumprofile;u=13501

Leave a Reply

Your email address will not be published.