Zoom च्या अधिकच्या लोकप्रियतेमुळे Skype ने केले हे बदल..!


मुंबई: जगभरात व्हिडीओ कॉन्फरन्सींगची वाढती आवश्यकता लक्षात घेत स्काईपवर आता ‘मीट नाऊ’ हे फिचर देण्यात आले असून हे अ‍ॅप वापरण्यासाठी डाऊनलोडसह रजिस्ट्रेनशची अट देखील काढून टाकली आहे.

सध्या कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ या प्रकारातील कामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. यात व्हिडीओ कॉन्फरन्सींग हा अविभाज्य घटक आहे. याचा बिझनेस मीटींगसह विविध प्रोजेक्टच्या समन्वयासाठी उपयोग होत असतो. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव आढळून आल्यानंतर या प्रकारच्या अ‍ॅप्सच्या लोकप्रियततेत प्रचंड वाढ झाली आहे. याचमुळे अलीकडेच एकाच वेळी तब्बल १०० युजर्सला व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून कॉलींग करण्याची सुविधा असणारे झूम अ‍ॅप तुफान लोकप्रिय ठरले आहे.

अर्थात, झूमची लोकप्रियता ही या क्षेत्रातील आघाडीवर असणार्‍या मायक्रोसॉफ्टच्या स्काईपसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. यामुळे झूमच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्काईपने ‘मीट नाऊ’ हे फिचर सादर केले आहे. ‘मीट नाऊ’च्या माध्यमातून कुणी स्काईपचा युजर नसेल तसेच त्याने हे अ‍ॅप इन्स्टॉल केलेले नसेल तरी सुध्दा तो यावरून कॉलींग व कॉन्फरन्सींगचा वापर करू शकणार आहे. अर्थात, कुणीही साईन-अप न करतानही स्काईपचा वापर करू शकतो. मायक्रोसॉफ्टने याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती जाहीर केली आहे. यामुळे अगदी नवीन युजर देखील स्काईपचा अतिशय सुलभ पध्दतीत वापर करू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *