| इंदापूर / महादेव बंडगर | कर्मयोगी स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मला एका वेगळ्या सामाजिक, राजकीय व्यक्तीमत्वाची अनुभूती येते. असे प्रतिपादन निरा भीमा साखर कारखान्याचे संचालक,युवा नेते राजवर्धन पाटील यांनी केले आहे.
माजी मंत्री शंकरराव पाटील यांच्या 14 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदापूर कॉलेजमध्ये त्यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली. कर्मयोगी भाऊ (आजोबा) हे माझ्यासाठी नेहमीच एक विचार, एक शुद्ध आचार, एक प्रेरणाशक्ती, दिव्यत्वाची अनुभूती आणि समाजाप्रती असणारी जाणीव आणि जागृती आहे. आज मी जेव्हा तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करत असताना कर्मयोगी भाऊ आजोबांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना भेटतो तेव्हा त्यांच्या आठवणी लोक ज्या आत्मयतेने मांडतात, त्यातून मला सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत असते असेही ते म्हणाले.
भाऊंच्या कुळात आपला जन्म झाला याचे समाधान आणि अभिमान वाटतो. आदरणीय कर्मयोगी भाऊंना शत शत नमन करून कर्मयोगिंच्या विचाराचे बंधन बांधून आज मी कृतकृत्य झालो.अशी भावना याप्रसंगी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .