| मुंबई | अभिनेत्री कंगना राणौतच्या घर, कार्यालयावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलंय. यावर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार (MMC Act) झालीय. अनधिकृत बांधकाम सुरू असताना ३५४ अ अंतर्गत २४ तास अगोदर नोटीस दिली होती असे त्या ‘खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.
कारवाई सुडापोटी केली असेल तर मग त्या नटीनं पीओके म्हणून जो अपमान मुंबईचा केला, त्यावर कुठल्या कोर्टात दाद मागायची ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एमएमसी कायद्यानुसार कारवाई करा असं कोर्टानं यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे. मग कंगना प्रकरणात काय उणिवा राहिल्या ? त्या पाहू, असे त्या म्हणाल्या. कोर्टाच्या निर्णयावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
कंगनालाच ही नोटीस पहील्यांदा दिलीय, असं नाही. अशा अनेक नोटीसा पूर्वी दिल्या गेल्या आहेत. मग आताच असं काय झालं ? या निर्णयाचा परिणाम संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बांधकामांसंदर्भात होईल असे किशोरी पे़डणेकर म्हणाल्या.
याउलट महाराष्ट्रावर सूड उगवला जातोय. ज्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही ते ओकाऱ्या टाकून जातायत. यामुळं मुंबईकर संभ्रमात आहेत. परंतु त्यांना काय चाललंय ते चांगलं कळतंय असेही महापौर म्हणाल्या.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .