जागर इतिहासाचा : भाग २ – स्वराज्यात चोरीचा तपास लावण्याची पद्धत व शिक्षा..

आपण पाहिले स्वराज्य मध्ये कुठे चोरीचा प्रकार घडल्यास तो गुन्हा कशा पद्धतीने तपास लावायचा. आणि गुन्हेगाराला कसे पकडायचे आपण मागील भागात वाचले आहे.

https://rb.gy/1n2rra


स्वराज्य मध्ये कोठे चोरीचे प्रकरण घडले तर त्या घराचा मालक त्या गावातील नेमलेल्या मुकादम (पाटील) कडे जाऊन रीतसर तक्रार देतो. आणि पाटील सर्व हकीकत ऐकून आणि प्रत्यक्षरीत्या जाऊन पंचनामा केल्यानंतर पुढील तपास हा गावातील नेमलेल्या रखवालदार यांच्याकडे सुपूर्त करतो. रखवालदार यांना चोरी केलेल्या घटनेचा तपास आणि तसेच चोरी करणारा गुन्हेगार याची शोधमोहीम चालू करतात आणि कोणत्याही कारणामुळे गावातील नेमलेल्या रखवालदारना चोरीचा तपास किंवा गुन्हेगार पकडण्यात असमर्थ राहिले. तर त्या रखवालदारना मोठी किंमत मोजावी लागत असत. ती म्हणजे त्या रखवालदारना आपल्या स्वखर्चातून (आपल्या पदरच्या पैशातून) ज्याच्या वस्तू चोरीला गेलेले आहेत. त्या वस्तू घर मालकाला भरून देणे. थोडक्यात म्हणजे काय आपल्या पदरच्या पैशातून त्या घर मालकाची नुकसान भरपाई करून देणे. असे काही नियम स्वराज्या मध्ये चालत होते.

आता आपणा सर्वांना काही प्रश्न पडणे साहजिकच आहे.

प्रश्न पहिला १) खरंच स्वराज्य मध्ये असे काही नियम होते का आणि असे विचित्र नियम खरंच कोण पालन करत होतं का ?

प्रश्न दुसरा २) सर्वात मोठा प्रश्न चोरी करून गेलेला गुन्हेगार त्या रखवालदारना तो गुन्हेगार सापडत असे का? का त्यांना आपल्या पैशातून चोरीला गेलेला सर्व माल भरून देणे पद्धत खरी होती का आणि चोर नेमकी चोरी काय करायचा आणि कुतूहलाचा प्रश्न ही जबाबदारी राखनदार केव्हा रखवालदारा यांनाच का देत असत ?

प्रश्न तिसरा ३) चोरांना आणि गुन्हेगारांना स्वराज्य मध्ये कोणकोणत्या शिक्षा होत्या ? असे काही कुतूहलाचा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे.

याबाबत पुस्तक वाचन तसेच काही इतिहासाचे अभ्यासक आणि माझ्यापेक्षा जाणकार असणारे मित्रमंडळी विचारपूस केल्यावर आणि अभ्यास केल्यावर हे रोचक तथ्य मला समजले आणि आज मी ते तुमच्यासमोर मांडत आहेत.

तर मला वरील प्रश्नांची उत्तरे मिळाले..

१) स्वराज यामध्ये चोरीचा तपास अशाप्रकारे लावला जात होता का?

– तर याचे उत्तर हो आहे आणि ही पद्धत पूर्व काळापासून चालू होती. कोणत्याही वस्तीमध्ये या गावांमध्ये चोरी झाल्यास तिथल्या नेमलेल्या मुकादम (पाटील) गावातील नेमलेल्या रखवालदार यांना अशा जबाबदाऱ्या देत असत आणि हे रखवालदार किंवा राखनदार अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पडत असतात.

२) स्वराज्य मध्ये चोरीचा प्रकार घडल्यास तो गुन्हेगार सापडत असत का ?

– तर याचे उत्तर हो आहे. कारण जो गावचा राखंदार केव्हा रखवालदार असेल त्याला गावातील प्रत्येक लोकांचे गोष्टींची बातमी असते. गावामध्ये कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण मध्यमवर्गी आहे, या सर्व गोष्टींचे बातमी रखवालदार यांना असे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या रखवालदाराला त्या गावाची सुरक्षा ची जबाबदारी त्यांच्यावर असे. त्यामुळे गावात येणारे-जाणारे कोण. कोण गावातली माणस आहेत आणि कोण परक्या गावातली माणसं आहेत. अशी खडानखडा बातम्या रखवालदाराने माहित असेल. त्यामुळे रखवालदारना चोरीचा तपास लावण्यात काही अडचण येत नसे. त्यामुळे कुठे चोरीचा प्रकार घडल्यास या रखवालदाराचा जास्त उपयोग होत असत आणि कुठे चोरी घडली तर त्याचा जाब रखवालदार यांनाही विचारत असत. कोणत्या कारणांमुळे त्यांना चोरीचा मला आणि चोर पकडण्यात असमर्थ असल्यासयाच त्यांच्याकडून चोरलेला मला किंवा त्याची किंमत वसूल करत. दुसरी गोष्ट चोर त्या काळात कोणकोणत्या वस्तू चोरी करत असत. तर (अपवाद त्यात काही गोष्टी नसाव्यात) सोने आणि चांदीचे दागिने मग ते मंदिरातील देवाचे दागिने असेल किंवा एखाद्या घरातील स्त्रीचे दागिने असेल. शेतकर्याचे बैल, गाय, शेळी अशी जनावरे. एखाद्या घरातील शस्त्रसाठा त्यामधील सोन्याची कानिगिरी केलेली तलवार, कट्यार, खंजीर असे काही मौल्यवान वस्तू किंवा जनावर चोर चोरी करून दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या प्रांतात जाऊन त्या गोष्टी विकत असत.

दरम्यान, श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी वाचन करत असताना. खूप सार्‍या न्यायनिवाडा यांचे उताऱ्यांचे उल्लेख केलेले आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गुन्हेगारांना कोणकोणत्या शिक्षा दिली आहे. याची पूर्ण संक्षिप्त माहिती दिलेली आहे. गुन्हेगारांना कोणकोणत्या शिक्षा होत्या, ते आपण पाहूया. मुळात गुन्हेगाराने कोणता गुन्हा केला आहे. आणि तो गुन्हा किती अपराधी आहे आणि तसेच किती क्रूर आहे या सर्वांचा न्यायनिवाडा करून, त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येत असत.

स्वराज्य मध्ये त्या काळात कोणता शिक्षा उपलब्ध त्याची यादी खालील प्रमाणे..

१. अक्षम्य गुन्हा असेल तर त्या गुन्हेगाराला डोकी मारावयाची (देहदंडाची शिक्षा किंवा मृत्युदंड) अशी शिक्षा सुनावण्यात येत असत. ही शिक्षा म्हणजे गुन्हेगाराचे मानेपासून मुंडके कापणे, यालाच डोकी मारायची असे म्हणत.
२.उजवा हात किंवा पाय तोडायचे.( कधी दोन्ही एकत्र कराचे किंवा वेगवेगळे शिक्षा अमलात आणायची)
३. उजवा हात तोडायचे आणि एक कान कापायचे.
४. गुन्हेगाराला अंधारकोठडीत साखळदंडांच्या बेड्यांत घालून मृत्यू येईपर्यंत शिक्षा भोगायची ( आजन्म कारावास)

असे काही शिक्षा त्याकाळी गुन्हेगारांना मिळत असत. या गोष्टीवर हे दिसून येते की स्वराज्या मध्ये न्यायव्यवस्था फार कडक होती.


संदर्भ :
१. पानसे घराण्याचा इतिहास.
लेखक केशव रंगनाथ पानसे
२. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे रोजनिशी.

– मोहित पांचाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *