| पुणे | पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ट्वीटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुण्यात अजित पवार यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याविषयी आपली भूमिका मांडली. बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
जो-तो स्वतंत्र विचाराचा, काय ट्वीट करायचं हा ज्याला-त्याला अधिकार : अजित पवार
याविषयी अजित पवार म्हणाले की, “माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही. आता अलिकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं, तुमच्या मुलाने ते ट्वीट केलं. मला तेवढाच उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो-तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला-त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला-त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.”
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .