मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव अजून तहानलेलेच..!

| मुंबई | गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने मुंबईकरांना थोडा दिलासा दिला आहे. तलाव क्षेत्रात आता सात लाख ५१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा पुढील १९७ दिवस म्हणजे साडेसहा महिने मुंबईची तहान भागवू शकेल. मात्र तलावांमध्ये आणखी ४८ टक्के जलसाठा कमी असल्याने २० टक्के पाणीकपात अशीच सुरू राहणार आहे.

मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गतवर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये यंदा निम्म्याहून कमी जलसाठा आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात चांगला जोर धरला आहे. परिणामी, एका आठवड्यात तलावांची पातळी १५ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *