| मुंबई | कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक शेतमजूर यांनी आज संप केला होता. राज्यात मंत्रालयासह सर्व जिल्हयातील सरकारी कार्यालये आणि शाळा बंद होत्या. शासकीय मुद्रणालये, मोटार परिवहन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, तंत्र शिक्षण विभाग, कामगार आयुक्त कार्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, विमा संचालनालय अधिदान व लेखा कार्यालय, आरोग्य भवन, विज्ञान संस्था, कला संचालनालय, मस्त्य विभाग, सार्वजनिक पाटबंधारे व बांधकाम विभाग, शासकीय दुग्धशाळा, शासकीय महाविद्यालये, विविध शासकीय संचालनालयातील कर्मचारी या संपात संपूर्णत: सहभागी झाल्याची माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली.
या संपाची तीव्रता आणि कर्मचाऱ्यांचा असंतोष लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने संघटनेला चर्चेला बोलवावे असेही श्री. अविनाश दौंड यांनी सांगितले. हा एक दिवसीय संप हा पुढील मोठया लढयाची सुरवात असून सरकारने त्याची योग्यती दखल वेळीच घ्यावी असे संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .
e7JfyqxE4lsbqQ