शिवसेनेच्या उमेदवार पुत्राचा राष्ट्रवादीच्या आमदाराच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप..!

| सोलापूर | महाविकास आघाडीत थोड्या फार कुरबुरी सुरू आहेत हे सत्य असले तरी आता मात्र शिवसेना उमेदवाराच्या पुत्राने राष्ट्रवादीच्या आमदारावर खोटे प्रमाणपत्र निवडणुकीत वापरले म्हणून आरोप केले आहेत. हे प्रकरण आहे मोहोळ मतदारसंघातील. मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे विद्यमान यशवंत माने यांचे दोन जातीचे दाखले असून त्यांनी बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना तत्कालीन उमेदवाराचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. याबाबत त्यांनी आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले यावेळी पत्रकार परिषदेत सादर केले.

बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. त्यानुसार यशवंत माने यांच्याकडे SC चे जात प्रमाणपत्र आहे तर पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. त्यामुळे आमदार माने हे मागील १०० वर्षापासून इंदापूर तालुक्यात राहत असून त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केलीय.

आमदार माने यांचा कैकाडी समाजाचा इंदापूरमधील शेळगावचा दाखला हा VJ विमुक्त वर्गातील असून १९८५ साली त्यांनी हा दाखला काढला होता तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा दावा तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांनी यावेळी केला. याबाबत बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिल्याचा दावा सोमेश क्षीरसागर यांनी केलाय.

दरम्यान या आरोपाबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने यांना विचारले असता, क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाबद्दल मला फार काही बोलायचे नाही. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करु द्या. मी यावर काही प्रतिक्रिया देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *