| मुंबई | कोरोनाच्या संकटातून अजूनही देशाची सुटका झालेली नाही. असं असलं तरीही दिलासादायक बाब ही की देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिल्लीतला रिकव्हरी रेट ८८ टक्के, हरयाणातला ७८ टक्के, आसामचा ७६ टक्के, तेलंगणचा ७४ टक्के, तामिळनाडू आणि गुजरात या दोन राज्यांचा ७३ टक्के, राजस्थान ७० टक्के, मध्य प्रदेश ६९ टक्के आणि गोवा ६८ टक्के असे रिकव्हरी रेट आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव आर भूषण यांनी दिली आहे.
भारतातले १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. आपले करोनायोद्धे अर्थात आपले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक यांनी घेतलेल्या या कष्टाचं हे फळ आहे असंही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं. देशातला मृत्यूदर २.२१ टक्के झाला असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. जगातला हा अत्यल्प दर आहे असंही आरोग्यमंत्रालयाने सांगितलं. तसंच देशातल्या २४ राज्यांमधला मृत्यूदर देशातल्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे असंही भूषण यांनी सांगितलं.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .