अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !

| अकोले | थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याचा जीवनाचा. या तत्त्वानुसार कोरोना प्रार्दुभावकाळात रक्तादानाचे महत्व ओळखत अकोले तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वतीने काल रक्तदान शिबीर सर्वज्ञ हॅास्पिटल येथे संपन्न झाले.

या शिबिरात अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी रक्तदान करत योगदान दिले. डॅा. रविद्र गोर्डे यांच्या सर्वज्ञ हॅास्पिटल मध्ये अर्पण ब्लड बॅक, संगमनेर यांच्या मदतीने शिक्षकांनी रक्तदान शिबीर आयोजित करत यामध्ये जवळपास ४० शिक्षकांनी रक्तदान केले.

यावेळी अकोले तालुक्यातील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षक प्रतिक नेटके, सतिश जाधव, अर्जुन तळपाडे, सतिश वैद्य, सुभाष बगनर, गोरक्षनाथ देशमुख, संजय कुमार शिंदे, सचिन गवांदे, संतोष सदगीर, रुपेश वाकचाैरे, रोहिदास जाधव, राहुल सोनवणे, सुधाकर लिंगापुरे, गणपत गावंडे, भरत लोहकरे, भाऊसाहेब कडु, लक्ष्मण पिंगळे, संदिप बांबळे, बाळु खाडे, नवनाथ वाकचाैरे, रघुनाथ तुपसुंदर, गणेश आंबरे, लहू गांगड, विजय तळपाडे, दीपक बोऱ्हाडे,संतोष मोरे, पोपट चौधरी, नंदकुमार पांदे,सचिन फुलसुंदर, जालिंदर ढोकरे आदि शिक्षक तसेच पंचायत समितीचे लिपिक शांताराम आव्हाड व ग्रामस्थ निलेश नाईकवाडी व हर्षदा गजे यांनी रक्तदान करत या शिबिरात योगदान दिले.

यावेळी आयोजकांकडून चला रक्तदान मोहिम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया ही मोहीम अजुन प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.