अन्वयार्थ : हा अविनयशील नातू कोणाचा..?

मागील आठ महिन्यात एकीकडे जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या सेवानिकषात बसत नसलेले व कुठलेही प्रशिक्षण दिलेले नसताना कोरोना काळात आपत्कालीन परिस्थिती समजून घेत शिक्षकांनी प्रत्यक्ष फिल्ड वर उतरत पोलीस व आरोग्य विभाग यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलेले आहे.

पोलिसांसोबत व पोलिसांशिवाय रस्त्यावरील चेकपोस्टवर पोलिसमित्र म्हणून दिवसरात्र काम केले आहे. हे करत असताना शिक्षकांना रस्त्यावर ट्रक ने उडवून जीव गमविल्याचे उदाहरण आपल्या समोर आहे.

आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा देऊन आरोग्य सेवक बनत प्रत्यक्ष कॉरंटाइन सेंटर, आरोग्य तपासणी, पॉझिटिव्ह पेशंट कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोन सर्व्हे, कंटेन्मेंट झोन लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरविणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी चा सर्व्हे इत्यादी कामे शिक्षक संवर्गाने केलेली आहेत. हे करत असताना कित्येक शिक्षक संपर्कात येऊन पॉझिटिव्ह झाले व दुर्दवाने मयत ही झालेली आहेत.

हे घडत असताना आपल्या घरात निवांत झोपलेल्या अशा राजकीय नातूचें डोळे बंद होते का? तर दुसरीकडे शक्य त्या सर्व नियमांचा व परिस्थिती चा सामना करत आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जबाबदारी पूर्वक डिजिटल माध्यमांचा व साधनांचा वापर करत शैक्षणिक कार्य केले आहे करत आहे. ते करत राहावे हे सांगण्याचे महान कार्य महाराष्ट्रातील कोणी नातवाने करावे ही वेळ शाहू, फुले, कर्मवीरांचा शैक्षणिक वारसा चालविणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षकांवर अद्याप आलेली नाही. हे ही विनयशीलतेने याच नातवांच्या कु-मानसिकतेने समजून घ्यावे.

– शिवाजी खुडे ( लेखक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ते आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *