
| मुंबई | अवयवदानाचे महत्त्व सर्वांना पटून अवयवदान करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयव दान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांना केली आहे.
विद्यापीठांनी दिनांक १३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन साजरा करावा तसेच दिनांक १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत जनजागृती सप्ताह साजरा करून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे अशा सूचना राज्यपालांनी विद्यापीठांना केल्या आहेत.
यासंदर्भात राज्यपालांच्या प्रधान सचिवांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. अवयव दान दिनानिमित्त अनेक विद्यापीठांनी चर्चासत्र – वेबिनारचे आयोजन केले असल्याचे कळविले आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!