असा मिळावा गॅस सिलिंडर फक्त २०० रुपयात..!

| मुंबई | वाढती महागाई, आर्थिक संकट आणि अशातच जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत. सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी मोठी वाढ केली असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तो गॅस सिलिंडर 650 रुपयांच्या जवळपास मिळत आहे.

वाढत्या महागाईमुळे तुमच्या खिशावरील भार वाढलेला असताना आता आम्ही एक दिलासा देणारी बातमी सांगणार आहोत. आता तुम्ही एका स्कीममार्फत हे सिलिंडर अवघ्या 200 रुपयांमध्येही खरेदी करू शकता.

पेटीएमवर तुमचा एलपीजी सिलेंडर बुक करुन तुम्ही 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. पेटीएमच्या विशेष कॅशबॅकचा फायदा घेऊन तुम्ही 200 ते 250 रुपयांच्या किंमतीवर HP, Indane, Bharat Gas एलपीजी सिलेंडर मिळवू शकता.

कसे करावे..?

✓ पेटीएम अ‍ॅप नसेल तर पहिले ते डाउनलोड करा.
✓ पेटीएम अ‍ॅप उघडून त्यात ‘recharge and pay bills’ वर जा.
त्यानंतर ‘recharge and pay bills’ वर जा.
✓ आता ‘book a cylinder’ पर्याय उघडून भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून आपला गॅस प्रोव्हायडर निवडा.
✓ रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा आपला LPG ID भरा.
✓ यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. आता पेमेंट करण्यापूर्वी ऑफरवर ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *