अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा दिशादर्शक अभिनव उपक्रम

| पारनेर | कोव्हिड-१९ह्या जागतिक महामारीचा सामना शासन मोठ्या धैर्याने करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने कोव्हिड संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील पहिले सर्व सोईंनी युक्त असलेले महिला कोव्हिड सेंटर पारनेर येथे संस्थेच्या राजमाता जिजाऊ विद्यार्थीनी वसतीगृहात काल दि. ७ रोजी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे, सेक्रेटरी जी. डी. खानदेशे जिल्हा मराठा संस्थेचे कार्यकारी सदस्य यांच्या संकल्पनेतून तालुक्याच्या सेवेत कार्यन्वित होत आहे.

जिल्हा मराठा संस्थेच्या पुढाकारामुळे कोव्हिड सेंटरच्या माध्यमातुन महिला रुग्णांच्या सोयीबरोबरच प्रशासनाचा ताण हलका होणार आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात येऊन शाळा, महाविद्यालये या शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या असताना राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रसंगी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्था पुढे येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या शैक्षणिक संस्थेने संपूर्ण लाॕकडाउन काळात जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या शेकडो शाखा शाळामधून आॕनलाइन शिक्षणाचे धडे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सेक्रेटरी जी.डी.खानदेशे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करुन ज्ञानज्योत तेवत ठेवण्याचे कार्य संकटाच्या परिस्थितीत सुरु केले.

सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेने सुमारे एक्कावन्न लाख रुपये मुख्यमंत्री सहायत्ता निधी कोव्हिड -१९ मध्ये जमा करण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाने घेतला.

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संस्थेचे नुकतेच सुवर्णमहोत्सव साजरा करत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून संस्थेने शेवटच्या घटका पर्यत ज्ञानदानाचे कार्य पोहचवताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सातत्याने केले.

कोरोना महामारीच्या संकटकाळात संस्थेने आर्थिक मदत निधी देण्याबरोबरच जिल्हाभरातील शेकडो शाखा शाळा, महाविद्यालये, होस्टेल कोव्हिड सेंटर, संस्थात्मक विलगिकरण कक्षासाठी खुली करुन देवून अनेकांसाठी डोळ्यात अंजन घालणारा आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने पारनेर येथिल न्यू आर्टस , सायन्स अॕण्ड काॕमर्स काॕलेजचे होस्टेल कोव्हिड सेंटर व संस्थात्मक विलगिकरणासाठी,निघोज येथिल श्री मुलिकादेवी विद्यालय संस्थात्मक विलगिकरणासाठी गोरेगाव येथिल गोरेश्वर विद्यालय संस्थात्मक विलगिकरण कक्षासाठी सर्व भौतिक सुविधासह समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपत खुली केली. जिल्ह्यातील तसेच तालुक्यात गावातून कामाच्या निमित्ताने पुणे, मुंबई येथे स्थायिक झालेल्या हजारो भूमिपुत्राना कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी गावाकडे माघारी यावे लागले.

या भयवाह परिस्थितीत, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी आपल्या संस्थेच्या जिल्हा भरातील सर्व शाळा महाविद्यालये व होस्टेल भूमिपुत्रासाठी आजतागायत खुली करुन सुविधा उपल्बध करुन दिल्या आहे. जिल्हा मराठा संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाबदल सर्व स्तरातून संस्थेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *