अहमदनगर स्वराज्य शिक्षक मंडळ स्वयंभू, कुणाच्या दावणीला कदापि नाही – स्वराज्य संस्थापक नेते योगेश थोरात यांची ठाम ग्वाही..

| अहमदनगर | स्वराज्य मंडळाच्या वाढत्या जनाधाराला पाहून पायाखाली वाळू नसल्यागत इतरांकडून बेफाम आरोप होत आहेत, स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ उभे राहिल्यापासून मंडळाची काम करण्याची पद्धत, नीतिमत्ता, खरेपणा या गोष्टींचा अनुभव आलेल्या सामान्य सभासदांनी स्वराज्याच्या बाजूने मन वळविल्याने प्रस्थापित नेत्यांची जणू काही झोप उडाली आहे. कालपर्यंत आपला मतदार असलेला सभासद नव्याने उभारी घेतलेल्या स्वराज्य मंडळाकडे जात असल्याने अनेकांना अजीर्ण झालेले दिसते. सभासद जाणकार असतो, त्याला स्वतःची स्वतंत्र मते असतात, भविष्याचा वेध घेण्याचा क्षमता त्याच्यात असते, हे विसरून अमका आमचा आणि तमका त्याचा यावरूनच जिल्ह्यात रस्सीखेच बघायला मिळत आहे. यात सामान्य सभासदांच्या मागणीकडे स्वराज्य मंडळ सोडून कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून स्वराज्य मंडळ हा एक सक्षम पर्याय आहे यात शंका नाही. आणि अशा पवित्र कार्यात स्वराज्य मंडळाशी स्वकीय शत्रूंनी दगाफटका केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रमाणे इतिहास त्याची फितूर म्हणून नोंद घेईल यात शंका नाही. त्यामुळे विरोधकांनी स्वराज्याच्या केलेल्या अधिकच्या काळजीसाठी स्वराज्य मंडळ त्यांचे आभारी आहे, असे मत स्वराज्याचे संस्थापक नेते योगेश थोरात यांनी मांडले.

मैत्री आणि राजकारण यातील फरक मुरलेल्या राजकीय व्यक्तींना करता न येणे हे मोठे दुर्दैव :

आजकाल विरोधात लढणे म्हणजे जणू काही तलवारी घेऊन उभे राहिल्यागत परिस्थिती प्रस्थापित वर्गाने समाजमानासात करून ठेवल्याचे कालच्या एका बातमीने जाणवले. त्यातला खरेखोटेपणा हा भाग अलाहिदा; मात्र ही रोवत चाललेली बीजे समाजासाठी नक्कीच घातक आहेत. जिल्ह्याच्या राजकारनात डॉ संजय कळमकर, बापू तांबे, राजेंद्र शिंदे, एकनाथ व्यवहारे आदी वेगवेगळ्या मंडळाच्या नेत्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारण राजकारणच्या ठिकाणी आणि मैत्री मैत्रीच्या ठिकाणी हे सामान्य संकेत सुद्धा आता प्रस्थापित वर्गाकडून पायदळी तुडवले जात आहेत. हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे असे वाटते.

स्वराज्य मंडळाच्या हालचालींवर प्रस्थापितांची करडी नजर, बिनबुडाचे आरोपांची खैरात :

कालपर्यंत स्वराज्य मंडळाला मनावर घेण्याची गरज नाही, असे म्हणणारे प्रस्थापित, स्वराज्य मंडळातील पदाधिकारी काय करतात, कुठे जातात, कुणाला भेटतात यावर करडी नजर ठेवून असल्याचे लक्षात येत आहे. तसेच हे मंडळ अमक्या तमक्याचे संगणेवरून निघाले, त्यासाठी मोठा पैशाचा व्यवहार झाला वगैरे अशा भ्रामक आणि हास्यास्पद समजुती पसरवण्याचे पेव फुटले आहे. कुठल्याही आधाराशिवाय मनाला येईल ते बोलणे यावरून स्वराज्य मंडळाने घेतलेली आघाडी जिल्हाभर सभासदांच्या निदर्शनास आलेली आहे. स्वराज्य मंडळाकडे असलेला वाढता जनाधार, असलेली काम करणाऱ्या सभासदांची भक्कम फळी, निष्ठावान मैत्री या सगळ्यांच्या परिपकाने वाढत जाणाऱ्या स्वराज्य मंडलाला नामोहरम करण्यासाठी भविष्यात अनेक युत्या आघाड्या उभ्या राहिल्या तर सभासदांना त्याचे नवल वाटणार नाही. स्वराज्य मंडळातील पदाधिकारी कोणतेही काम लपून करणार नाहीत, जे आहे ते समाजाभिमुख आहे, त्यामुळे इतरांनी स्वराज्य मंडळावर नजर ठेवण्याचे कष्ट घेऊ नयेत असे स्वराज्य पदाधिकारी यांनी कळविले आहे.

दबक्या आवाजात का होईना स्वराज्य मंडळाला विजयाचे दावेदार म्हणून जनमानसात मान्यता :

कालच्या स्वराज्य मंडळाला टीकेच्या रडारवर घेण्याच्या प्रयत्नात बातमी पसरवणारांनी सभासदांना चर्चेला रान खुले करून दिले. अनेक समाज माध्यमांवर सभासद स्वराज्य मंडळाबात बोलते झाले. अनेकांनी ‘काय केल्याने स्वराज्य मंडळ सत्तेत येईल’ याचे सल्ले दिले. तर कुणी ‘स्वराज्य मंडळ कसे कणखरपणे उभे आहे, त्यांना आज सर्वाधिक संधी कशी आहे’ अशा चर्चांची परिणीती काल समाज माध्यमांमधून समोर आली. या सगळ्या प्रकारातून स्वराज्य मंडळच विजयाचे दावेदार असल्याची चर्चा दिवसभर अनेक व्हाट्स अप ग्रुप वर रंगलेली पहायला मिळाली. लवकरच होणाऱ्या निवडणूकित स्वराज्य मंडळ कुणाकुणाला धक्का देणार आहे हे, आता येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published.