| नवी दिल्ली | १ डिसेंबर म्हणजे उद्यापासून आर्थिक घडामोडींमधील काही नियम बदलले आहेत. ही बाब तुमच्या खिशाशी संदर्भात असल्याने याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं.
१) आरटीजीएस (RTGS) २४ तास :
रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (Reserve Bank of India) ने आपल्या ऑक्टोबर क्रेडीट पॉलिसीमध्ये आरटीजीएस (RTGS) २४ तास सुरु ठेवण्याची घोषणा केलीय. एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पर्याय दिलेयत. यामध्ये RTGS, NEFT आणि IMPS चा वापर जास्त केला जातो. गेल्या डिसेंबरमध्ये NEFT २४ तासांसाठी सुरु करण्यात आली होती. आरबीआयच्या गाईडलाईननुसार आरटीजीएस सर्व्हीस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत मिळते.
२) एलपीजी सिलेंडर किंमत :
एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याचा पहिल्या तारखेला अपडेट होते. या किंमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा देखील मिळू शकतो. अशात १ डिसेंबरला एलपीजी किंमतीत बदल होऊ शकतो.
३) प्रिमियममध्ये बदल :
आता ५ वर्षानंतर विमाधारकांना प्रिमियमची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. म्हणजे विमाधारक अर्ध्या हफ्त्यासोबत पॉलिसी सुरु ठेवू शकतील.
४) धावणार नव्या ट्रेन :
कोरोना काळात रेल्वे आपल्या सेवा हळूहळू सुरु करतेय. स्पेशल ट्रेन्सची संख्या वाढवण्यात आलीय. १ डिसेंबरपासून नव्या ट्रेन धावण्याच्या तयारीत आहेत.
५) हफ्ता न दिल्यास :
कोरोना व्हायरस संक्रमणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यायत. यामुळे अनेकांना विमा पॉलिसीचा हफ्ता वेळेवर देता आला नाहीय. खर्च जास्त असल्याने पॉलीसी वेळेवर न भरलेल्यांची पॉलीसी बंद होते. पण विमा कंपन्यांनी यामध्ये बदल केलाय. यानुसार आता ५ वर्षानंतर विमाधारक प्रिमियमची किंमत ५० टक्के कमी होऊ शकते. म्हणजेच ते अर्धा हफ्ता देऊन पॉलीसी सुरु ठेवू शकतात.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .