आधी पिता, आता पुत्र..! ही जोडगोळी सामान्य नागरिकांसोबत आपल्या हक्काच्या शिवसैनिकांची देखील घेत आहेत काळजी..!

| कल्याण | ठाणे शहर आणि जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोविडग्रस्त शिवसैनिकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री  श्री एकनाथ शिंदेनंतर आता कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील कोविड वार्ड मध्ये जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

वंदनीय बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आणि कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर श्री राजेंद्र देवळेकर यांच्यावर निऑन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी श्री देवळेकर यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि धीर दिला. ” तमाम शिवसैनिकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि मोठ्या साहेबांनी देखील आपली चौकशी केलीय. आपले बंड्या साळवी देखील आता बरे झालेत. तुम्हीही काही काळजी करू नका. तुम्हीसुद्धा लवकर बरे होणार आहात. माझं डॉक्टरांशी बोलणं सुरू आहे. काहीही अडचण वाटली तर मला कधीही फोन करा “. खासदार डॉ शिंदे यांच्या या धीर देणाऱ्या शब्दांनी श्री देवळेकर यांस गहिवरून आले.

गेल्याच आठवड्यात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे PPE किट घालून कोविडग्रस्त वार्डात शिवसैनिक बंड्या साळवी यांस भेटायला गेले होते. कोरोनाच्या संकट काळात शिंदे पिता पुत्रांच्या माध्यमातून रुगणसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू आहे. नुकतेच महाड येथील झालेल्या दुर्घटनेत वाचलेल्या 2 चिमुकल्यांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनने दत्तक घेतले आहे. शिंदे पिता – पुत्रांची संवेदनशीलता ठाण्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *