आपण मास्क वापरत नसाल तर सावधान.. इथे करावे लागेल काम, हायकोर्टाचा आदेश

| अहमदाबाद | गुजरामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी मोठी आदेश दिला आहे. जे लोक मास्क घालणार नाहीत, त्यांच्याकडून फक्त दंड वसूल करणे पुरेसे नाही, तर या लोकांकडून कोविड सेंटरमध्ये 5-6 तास सेवा करून घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाने राज्य सरकारला यासंबंधीत एक अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

आतापर्यंत देशातील 94% रुग्ण बरे झाले

देशात कोरोनाचे आकडे गेल्या पाच दिवसांपासून दिलासा देणारे आहेत. प्रत्येक दिवशी अॅक्टिव्ह केस कमी होत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नवीन केस 40 हजारांनी कमी येत आहेत. मंगळवारी एकूण 36 हजार 456 रुग्ण आढळले, 43 हजार 203 बरे झाले आणि 500 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 94.99 लाख केस आल्या आहेत. यामधून 89.31 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 1.38 लाख व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आलेल्या एकूण केसमध्ये 94% रुग्ण बरे झाले आहेत. तर 4.51% जणांवर उपचार सुरू आहेत.

दिल्लीमध्ये सर्वात जास्त 31% लोकसंख्येची कोरोना टेस्ट झाल्या आहेत. मध्यप्रदेशात सर्वात कमी केवळ 4.6% जणांची कोरोना टेस्ट झाल्या आहेत. देशात एकूण 14.14 कोटी टेस्ट म्हणजे लोकसंख्यानुसार 11% लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे. संख्येच्या हिशोबाने यूपी-बिहार टॉपवर आहे मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने दक्षिणेतील राज्य आघाडीवर आहेत. जम्मू काश्मीरमध्ये लोकसंध्येनुसार 22.8%, आंध्र प्रदेशात 19.3%, केरळात 17.8%, कर्नाटकात 16.9%, तमिलनाडूत 15.9% लोकांची टेस्ट झाली आहे. आठ राज्यांमध्ये नॅशनल एव्हरेजपेक्षाही कमी टेस्टिंग होत आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *