| मुंबई | गुगल प्ले स्टोरवरून मोबाइल पेमेंट अॅप पेटीएम काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर ग्राहकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का? तर याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम हे दोन्ही अॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे Paytm आणि Paytm First Game हे दोन अॅप प्ले स्टोअरवर दिसत नाही आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
पीटीएम हे देशातील आघाडीचे पेमेंट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार पेटीएमचे ५० मिलियन सक्रीय युजर्स आहेत. त्यामुळे या सर्व युजर्सचे पैसे App प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यावर सुरक्षित आहेत का असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला गेला. दरम्यान याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘पेटीएमल अँड्रॉइड अॅप काही काळाकरता नवीन डाऊनलोड आणि अपडेटसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसेल. लवकरच ते परत येईल. तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत. तुम्ही नेहमीप्रमाणे अॅप वापरू शकता.’ पेटीएमने आणखी एक ट्वीट करत ग्राहकांना खात्री दिली आहे की त्यांचे पैसे आणि शिल्लक रक्कम सेफ आहे
गुगल प्ले स्टोअरने हे अॅप जुगारासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढून टाकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगलनं याआधी ऑनलाइन जुगाराला परवानगी देत नाही किंवा अशा अॅप्सना समर्थन देत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर हे दोन्ही अॅप काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता गुगल प्ले स्टोरवर Paytm उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन युझर्स हे अॅप डाऊनलोड करू शकत नाहीत. मात्र तुम्ही आधीपासूनच तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केलेलं असेल तर आता तुम्ही त्याचा वापर करू शकता की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
दरम्यान, नुकत्याच उपलब्ध माहितीनुसार Paytm ऍप पुन्हा गुगल प्ले वर उपलब्ध झाले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .