| मुंबई | कोरोना महामारीच्या विपरीत काळात जनसामान्यांची सेवा करणार्या भारत व अमेरिकेतील दानशूर व्यक्ती व उद्योग संस्थांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत कोविड क्रूसेडर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात टाटा समूहाचे मानद प्रमुख रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, शेफ विकास खन्ना, हौस्टनचे महापौर सिल्व्हेस्टर टर्नर, गोदरेज समूह, महिंद्रा अँड महिंद्रा, सेवाटेकच्या सोनी कक्कर, वालीस बँकेचे आसिफ डाकरी व पेरेनियल्स अँड सुदरलँडचे अमोल बिनिवाले यांना कोविड योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ, इंडो अमेरिकन चेंबरच्या अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव, पश्चिम विभागाचे अध्यक्ष नौशाद पंजवानी, निवड समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .