एक्का फाउंडेशन आयोजित प्रतिष्ठित राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| ठाणे | पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल काल प्रकाशित करण्यात आला. राज्यभरातील जवळपास रेकॉर्ड ब्रेक ५८७ निबंध या स्पर्धेत सहभागी झाले होते.

दरम्यान एक्का फाउंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठान मार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम नेहमी राबविले जात असतात. अगदी सांगली – कोल्हापूर पूरग्रस्त मदत, आदिवासी भागात आवश्यक मदत, विविध करिअर मार्गदर्शन करणारे सेमिनार, गड किल्ले संवर्धन मोहिमा किंवा सध्या कोरोना संकटात आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, सर्वेक्षण, अन्नधान्य वाटप आदी विविध कार्यक्रम राबवले जातात.

सदरचा निबंध स्पर्धेचा निकाल एप्रिल मध्ये प्रकाशित होणे अपेक्षित असताना, लॉक डाऊन मुळे परीक्षक कोकणात अडकले आणि निबंध मुंबईत त्यामुळे अधिकचा उशीर झाला. त्यात निबंध संख्या रेकॉर्ड ब्रेक असल्याने आणि संबंध राज्यातून उदंड प्रतिसाद आल्याने त्याचे चाळण लावून विलागिकरण करणे आणि उरलेल्या निबंधातून प्रथम तीन क्रमांक निवडणे तसे जिकिरीचे होते. परंतु प्रतिष्ठानची टीम व परीक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीने ते शक्य झाले.

विशेष म्हणजे या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना आम्ही प्रशस्तीपत्रक देणार असून विजेत्या स्पर्धकांशी संपर्क करून त्यांना ऑनलाईन बक्षीस रक्कम व प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात येणार आहे. असाच विश्वास आणि पाठबळ आपण आम्हावर दाखवत राहावे, वेगवेगळे उपक्रम, समाजपयोगी कामे आम्ही करत आहोत, करत राहू असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रविण काळे, सचिन घोडे, विकास चव्हाण, योगेश घरत, किरण लहामटे, मारुती बोराडे, प्रतिक मडावी, अरुण घोडे, निलेश मोरे, प्रतिक रेपाळे, संतोष भोये, सुनील मंचरे, अशोक मिसाळ आदी यांनी विशेष मेहनत घेतली.

विजेते स्पर्धक :
१. श्री. मंगेश गोसावी, वसई
२. सौ. आरती भालेराव , सांगली
३. श्री. वसंत जोशी, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *