एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला सज्जड दम

| भिवंडी | मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभर थैमान घातल्याने बळीराज्याच्या अडचणीत वाढ झाली असून हातातोंडाशी आलेले घास हिरावण्याची वेळ आता बळीराज्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने शेयकऱ्यांना तातडीची मदत घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत होती. राज्याचे मुख्यमंत्री यांनी या शेती नुकसानीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले आहेत. राज्यासह ठाणे जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी भिवंडी तालुक्यातील कांदळी गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

यावेळी शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे मागील वर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडला असता यावर्षी एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे लवकरात लवकर पाठविण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले आहेत.

भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यावर्षी तालुक्यात सुमारे १६ हजार हेकटर भातशेतीची तालुक्यात लागवड करण्यात आली होती. मात्र परतीच्या पावसाने सुमारे ८ हजार हुन अधिक भात शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली असून ठाणे जिल्ह्यात सुमारे ४५ टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसात उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जाईल असे आश्वासन देखील यावेळी शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्या प्रसंगी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे , प्रताधिकारी मोहन नळदकर, ठाणे जिल्हापरिषदेच्या जिल्हाध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील , तहसीलदार अधिक पाटील, गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे व कृषी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *