
| मुंबई | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात एक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला होता. साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.
एसटीची सेवा पूर्वपदावर येण्यासाठी अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याचे नमूद करत सरळसेवा भरतीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्यात आली होती. २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत चालक व वाहक पदामध्ये रोजंदार गट क्र. १ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या खंडित करण्यात आल्या होत्या. आज एका आदेशाद्वारे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची खंडित करण्यात आलेली सेवा पूर्ववत करण्यात यावी व गरजेनुसार नियमित वेतनश्रेणीवरील चालक व वाहकांचाच वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्याचवेळी अनुकंपा तत्त्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगितीही उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री