| पुणे / विनायक शिंदे । इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण , शासनाच्या सवलती, लाभांचा व प्रस्तावित योजना सवलती यांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन मंत्रीमंडळास शिफारस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित करण्यात आली आहे.
१४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपसमिती गठीत करण्याचे ठरले होते. या उपसमितीमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.
इतर मागासवर्ग समाजाच्या विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध विभागांच्या विविध मागण्या राज्य सरकारकडे केल्या जात आहेत. इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण , आजपर्यंत विविध विभागांमार्फत देत असलेले लाभ , सवलती यांचा अभ्यास होणार आहे.
शासनाच्या इतर मागासवर्गाच्या विविध विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे व परिणामकारक राबविण्यासाठी ही उपसमिती अभ्यास करेल व नविन सवलती व लाभाच्या योजना सर्वंकष अभ्यास करून प्रस्तावित करेल.
एकंदरीत इतर मागासवर्ग समाजाच्या संघटना व लोकप्रतिनिधी यांच्या पुढचे काही दिवस आंदोलनाच्या तलवारी म्यान राहतील अशी दक्षता सरकारकडून घेतल्याचे दिसून येते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .